अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून गेल्या सात दिवसांतच २१६ रुग्ण आढळले आहेत.
आज संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात राहणार्या 70 वर्षीय वृद्धाचा आज पहाटे मृत्यु झाल्याचा अहवाल नाशिक प्रशासनाने संगमनेर प्रशासनाला दिला आहे.
त्यामुळे आता संगमनेरात कोरोनाने बाधित होऊन मयत झालेल्यांची संख्या 12 वर गेली आहे. एकच दिवशी 23 रुग्ण तालुक्यात मिळून येऊ लागल्याने कोरोनापुढे शासन आणि प्रशासनाने हात टेकले आहेत.
संगमनेर तालुक्यातील बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला आहे. अनेक गावे क्वारंटाइन केली जात आहेत.
तालुक्यातील 150 जणांना आजवर कोरोनाची लागण झाली असून 100 जण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या 39 जणांवर उपचार सुरू आहेत.
त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात मागील १६ दिवसांत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १४ मार्च ते २० जून या पहिल्या ९० दिवसांच्या कालावधीत नगर शहर व जिल्ह्यात केवळ २८२ रुग्ण आढळून आले होते.
आता मात्र २१ जून ते ६ जुलै या १६ दिवसांतच ३८१ कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या सात दिवसांतच २१६ पॉझिटिव्ह आढळले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews