अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना योद्धा व पाथर्डीचे सुपुत्र कल्याण गाडे यांचा कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचा मुंबई येथे नुकताच वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी मृत्यु झाला आहे.
दोन वर्षापुर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन समाजकार्यात झोकून देणारे कोरोनाशी लढता-लढता कोरोना योद्धा कल्याण गाडे यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटल मध्ये तब्बल सात दिवस कोव्हिड -१९ शी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथील मुळ गावचे रहिवासी असणारे पंचायत समितीचे माजी सभापती दिवंगत मोहनराव गाडे यांचे चिरंजीव कल्याण गाडे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंता या पदावर कार्यरत होते.
सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना त्यांचे वडील मोहनराव गाडे यांचेकडून मिळाली होती. त्यांचे धारावी आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सामाजिक कार्यक्षेत्र होते.
माजी खासदार एकनाथ गायकवाड व विद्यमान शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे ते निकटवर्तीय होते. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हुमायुन आतार, संजय राजगुरु ,पप्पू बोर्डे, साबीर शेख असा त्यांचा मोठा सामाजिक गोतावळा होता.
दोन महिन्यापासून त्यांनी धारावी आणि विक्रोळी या उपनगरातील गरीब, गरजू व कोव्हिड -१९ संक्रमितांना राशन, किराणा, मास्क ,सॅनिटायझर चे वाटप करत हॉस्पिटल पर्यंत पोहचविण्याची मोलाची मदत केली.
शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनही त्यांना कोव्हिड -१९ चे संक्रमण झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले, भावजया व पुतणे असा मोठा परिवार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews