अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, तहसीलदार झाले फिर्यादी!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे.

परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे.

ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास करताना ताब्यात घेतलं आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या जिल्हाबंदी आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात तहसिलदार महेंद्र माळी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे – नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथील चेक पोस्ट वर श्रीगोंदा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चारूशीला पवार व योगीता ढोले ह्यांचे पथक येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना क्रीडाधिकारी नावंदे या पुण्याहून नगरला येत होत्या.

असताना त्यांना चेकपोस्ट वर चौकशी केली होती या दरम्यान त्यांच्याकडे येण्याजाण्यासाठी कोणताही पास आढळून न आल्याने त्यांना पथकातील महिला अधिकाऱ्यांनी

ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा अधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment