अहमदनगर ब्रेकिंग : नगर शहरातील या चौकात तरुणीवर पिकअप मध्ये बलात्कार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग सारख्या घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.

अगदी प्रवास करणे महिला , तरुणींसाठी प्रचंड धोक्याचे झाले असून नगर शहरात पिकअप मध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी  कि, काल नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरात राहणारी एक २१ वर्षांची तरुणी पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीत बसून नगर शहरातील पाटील हॉस्पिटल येथे येत असताना 

पाटील हॉस्पिटल चौकात उतरायचे आहे , असे गाडीतील २० ते ३० वयोगटाच्या तरुणास तरुणीने सांगितले तेव्हा तरुणी एकटी गाडी असल्याचे पाहून गाडीचे दरवाजे लॉक करुन पिकअप गाडीतच तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध लैगिक अत्याचार करुन बलात्कार केला

या घटनेने महिला , मुलीमध्ये खळबळ उडाली असून पिडीत तरुणीने या प्रकरणी कोतवाली पोलिसात फिर्याद दिल्यावरुन पिकअप पांढऱ्या गाडीतील अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३७६ , ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment