अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी (दि.७) सकाळी नगर मधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते.
महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर उतारावर उतरले.
रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर ते मोरांच्या जवळ पोहोचले असतानाच बाजूच्या करवंदाच्या जाळीत मोरांच्या शिकारीसाठी बिबट्या दबा धरून बसलेला होता.
हे तीन चार जण जवळ पोहोचल्याचे पाहून त्याने डरकाळी फोडत त्यांच्या विरुद्ध दिशेला उडी मारली. अचानक बिबट्या समोर दिसल्याने या युवकांनी घाबरून तेथून पळ काढला
व त्याबाबत लगेच निसर्गमित्र व जिल्ह्याचे व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. यावेळी त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग सुरू असल्याने त्यात डरकाळीचा आवाज रेकॉर्ड झाला.
साबळे यांनीही तातडीने या ठिकाणी जात हा परिसर पिंजून काढला. या भागात त्यांना डोंगर उतारावर काही भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.
ठसे पाहता हा मध्यम वयाचा बिबट्या असून गेल्या आठ दहा दिवसंपासून त्याचे या भागात वास्तव्य असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews