अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत त्यांनी तसे कळविले आहे. तसेच या पेजवरून कोणतीही पोस्ट आली, तर ती ग्राह्य धरू नये, असे तनपुरे यांनी म्हटले आहे.
त्यांच्या पेज वरून त्यांचे दौरे, व कामा संदर्भातील अपडेट्स तसेच लोकांसाठी संदेश दिले जातात. त्यामाध्यमातून लोकांपर्यंत तनपुरे यांचे उपक्रम पाठविले जातात.
सायबर क्राईम च्या घटनांत वाढ होत असतानाच चक्क मंत्र्यांचेच फेसबुक पेज हॅक झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान अस एखाद्या राजकीय व्यक्तीचे सोशल मीडिया हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी सुद्धा बऱ्याच लोकांना या गोष्टीचा सामना करावा लागला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved