अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक परिसगत शहणाऱ्या एका 16 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पल्सर दूचाकीवर बसवून पळवुन नेले.व त्यानंतर श्रीगोंदा येथील सृष्टी हटिलमध्ये नेवुन एका खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बलात्कार केला.
आरोपी अमोल शिंदे याने पारगाव सुद्रीक येथील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फोन करून पारगाव रोडवरील बायपास वर बोलावून घेतले. पीडितेची आई त्यावेळी घरात झोपली होती व भाऊ कामानिमित्त काष्टी येथे गेला होता.
बायपासवर गेल्यानंतर आरोपीने मोटारसायकल वर बसण्याचा आग्रह केला. मुलीने नकार दिल्याने त्याने हाताला ओढून बळजबरीने तिला गाडीवर बसवले. त्याने गाडी श्रीगोंदा शहरातील सृष्टी हॉटेलवर नेले. ओळखपत्र नसल्याने त्याना हॉटेलच्या लॉजिगवर प्रवेश मिळाला नाही.
आरोपीने लगेच तिला गाडीवर बसवून त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला. ओळखपत्र घेऊन तिला पुन्हा सृष्टी हॉटेलवर आला आणि खोली भाड्याने घेतली. खोलीमध्ये बळजबरीने ओढून पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बलात्कार केला.
६ जानेवारी रोजी हा खळबळजनक प्रकार घडला. पिडीत अल्पवयीन मुलीने श्रीगोंदा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.