अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.
दरम्यान अनिल राठोड यांचे निधन झाल्यानंतर अहमदनगर शहरातील राजकीय क्षेत्रात आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे.
मुकुंदनगरमध्ये राहत असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंटकची जबाबदारी मोठ्या प्रामाणिकपणे पार पाडणारे हनीफ जरीवाला यांचं नुकतंच निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
त्यांच्यावर खासगी रुग्नालयात उपचार सुरु होते. जरीवाला यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved