अहमदनगर ब्रेकिंग : दहावीच्या विद्याथ्र्याचे अपहरण !

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर ;- श्रीरामपुरातून इयता दहावीत शिकणाऱ्या आबासाहेब राजधर बाळापूरकर (वय १५) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद वडील राजधर बाळापूरकर यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास श्रीरामपूर एस.टी. स्टँड येथे मुलगा आबासाहेब बाळापूरकर यास बसमध्ये बसवले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कशाचीतरी फुस लावून पळवून नेले आहे.

पुढील तपास उपनिरीक्षक डी. बी. उजे करीत आहेत. दरम्यान, तपासी अधिकारी उपनिरीक्षक उजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सदर मुलाच्या पालकांनी सांगितले की, या मुलाला त्यांनी औरंगाबाद बसमध्ये बसून दिले होते.

आपण सदर बसच्या वाहकाशी संपर्क साधून चौकशी केली असता असा कुठलाही मुलगा मध्ये उतरला नसल्याचे सांगितले. यावरून तो औरंगाबाद येथे पोहोचला असावा त्यावरून पुढील तपास सुरू आहे. मात्र त्याचेकडे मोबाइलही नसल्याने त्याचे लोकेशन घेण्यासही पोलिसांना अडचणीचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment