अहमदनगर ब्रेकिंग : कार धरणात बुडून एकाचा मृत्यु !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- अनेकदा प्रवासाला निघाले कि आपल्याला निश्चित स्थळाची माहिती नसल्यास आपण गुगल मॅपची मदत घेतो. मात्र असेच काही जण गुगल मॅपच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले असता कार थेट धरणात गेल्याची विचित्र घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.

अकोले तालुक्यातील कोतुळ पुलावर एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आहे. जीपीएसची चुकीची दिशा तसेच सुचना फलक न लावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. 

शनिवार दि. 9 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी पुणे येथून गुरूदत्त शेखर, समिर अरुरकर व सतिष घुले हे तिघे कळसुबाई येथे ट्रेकींग करण्यासाठी निघाले होते.

त्यांनी जीपीएस यंत्रणा सुरू केली आणि कळसुबाईच्या शिखराकडे निघाले. मात्र, दुर्दैवाने तो जुना रस्ता त्यावर सेव्ह असल्यामुळे तो खालच्या पुलाहून दखविण्यात आला होता.

या धक्कादायक घटनेत सतिश सुरेश घुले (वय 35, रा, पाचवड, ता. पैठण, जि. औरंगाबाद) या वाहन चालकाचा मृत्यू झाला असून गुरूदत्त राज शेखर (रा. पिंपरी चिंचवड, जि. पुणे) व समिर अरुरकर (रा. पुणे, मुळ कोल्हापूर) असे दोघे जखमी झाले आहेत.या घटनेनंतर अकोले तालुक्यात  खळबळ उडली आहे.

रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी फार काही नाही तर अवघ्या 45 ते 50 च्या वेगाने होती. त्यामुळे, जर काही अपघात व्हायचा असता किंवा शंका आली असती तर गाडीचा वेग अटोक्यात येईल इतका निच्छित होता. हे जीपीएस वरुन सिद्ध होते.

दरम्यान, यांची गाडी जुण्या पुलाहून आल्यानंतर तेथे जो कच्चा रस्ता आहे. तेथून गाडी थेट आत गेली. विशेष म्हणजे ही गाडी अनावधानाने नव्हे तर त्यांना जीपीएस प्रणालीने तो रस्ता दाखविला. त्यामुळे, नि:शंक त्यांनी गाडी त्याच रोडने आत नेली.

चक्क 30 ते 40 मिटर गाडी आत नेली. वाहन चालक यांना वाटले होते की, नुकताच पाऊस झाला आहे. त्यामुळे, या रस्त्यावर पाणी साचले असेल, आपण सहज निघुन जाऊ. मात्र, पुढे गेल्यानंतर गाडी पुर्णत: तरंगली आणि या तिघांची तारंबळ उडली.

जेव्हा ही गाडी पाण्यात गेली तेव्हा पुढे दोघे बसलेले होते ते मागे एकजण. गाडी पाण्यात गेली आणि बघता बघता तिघांना मृत्यु दिसायला लागला. अशा वेळी तिघांनी गाडीच्या काचा खाली केल्या खर्‍या.

मात्र, वाहन चालक घुले यांना पोहता येत नव्हते. ते जिवाच्या आकांताने त्या रात्रीच्या काळोख्या अंधारात ओरडत होते. मात्र, ते प्रयत्न तोडके पडले आणि गाडीने देखील जलसमाधी घ्यायला सुरूवात केली.रात्री 1:45 वाजता ज्या तरुणाने या पिंपळगाव धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment