श्रीगोंदा :- तालुक्यात गर्भवती विवाहित तरुणीचा शुल्लक कारणातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुरेगाव शिवारात राहणारी विवाहित तरुणी मनिषा दत्तात्रय भोसले ही विसापूर येथून आठवडे बाजार करुन घरी येत असताना विसापूर शिवारात रेल्वे रुळालगतच्या रस्त्यावर
तीन वर्षांपूर्वी झालेल्या मागील भांडणाच्या कारणातून ८ आरोपींनी संगनमत करून रिव्हॉल्व्हर दाखवून लाथाबुक्क्याने मारहाण करुन तोंड कपड्याने दाबून मनिषा हिला जबर मारले.
त्यावेळी तिच्या पोटातील गर्भालाही मार लागला. उपचार सुरू असताना मनिषा भोसले या तरुणीचा मृत्यू झाला.
मयत मनिषाची आई रमेशबाई उंबरलाल काळे, रा. सुरेगाव शिवार यांनी बेलवंडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन
आरोपी सिटी आदिक काळे, जाहीर घड्याळ्या चव्हाण, जावेद घडयाळ्या चव्हाण, घड्याळ्या हिरामण चव्हाण, प्रविण कळशिंग्या भोसले, भैय्या कळशिंग्या भोसले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.