अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक ठरत आहे,केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे.ह्यामुळे प्रशासना विरोधात नागरिक जात आहेत.व जनतेचा संयम सुटल्याचे दिसत आहे.
आज जिल्हा रूग्णालयात एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला असून . रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचांची तोडफोड केली.
अचानक झालेल्या या घटनेने जिल्हा रूग्णालयात गोंधळाचे वातावरण झाले आहे, घटनास्थळी तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि नगर तालुक्यातील एका रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांनी यावरून चांगलाच गोंधळ घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून तोडफोडीचा पंचनामा करत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|