अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- घरातील वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून तब्बल ९० हजाराची वीजचोरी केल्याचा प्रताप महानगरपालिकेतील एका माजी नगरसेवकाने केल्याचे समोर आले आहे.
माजी नगरसेवक सचिन तुकाराम जाधव, मंगला आण्णासाहेब जाधव (दोघे रा. किंग्जगेट रोड, नगर) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण नगर कार्यालयाचे सहायक अभियंता स्वप्नील संजयराव उलहे (रा. वसंत टेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण नगर कार्यालयाचे सहायक अभियंता स्वप्नील उलहे यांनी सहकार्यासह १९ डिसेंबरला सचिन जाधव यांच्या घरी वीज मीटरची पाहणी केली.
मीटरमध्ये बिघाड करून वीजचोरी केली जात असल्याचे उलहे यांच्या लक्षात आले. माजी नगरसेवकांनी तब्बल ९० हजाराची वीज चोरल्याचे उघडकीस आले.
उलहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे सचिन जाधव व मंगला जाधव विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.