अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : भरधाव वेगात असलेल्या एसटीची पायी जात असलेल्या महिलेस धडक बसली.
त्यामुळे ही महिला खाली पडून तिच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने गंभीर जखमी होवून महिलेचा मृत्यू झाला.
ही घटना कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव एसटी थांब्याजवळ घडली.शांताबाई बन्सी पवार (रा.शेगुड ता.कर्जत) असे या मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत रविकांत साळुंके यांच्या फिर्यादीवरून बसचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे भरधाव वेगातील एमएच १४ बीटी १२८८ या बसची रस्त्याने पायी चालत असलेली महिला शांताबाई बन्शी पवार यांना पाठीमागुन बसची जोरात धडक बसली.
यामुळे या खाली पडून त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बसचालक जितेश रोहीदास कांबळे (रा.भीमनगर करमाळा) याच्याविरोधात रविकांत दिनकर साळुंके यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.