अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या गडावरून वाशिम जिल्ह्यातील घोणसरवाडी येथील तरुण शिवहरी एकनाथ सुरकुटे वय (२४ वर्षे) याने उडी मारून आत्महत्या केली.
हा प्रकार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी मृत तरुणाची आई आसराबाई सुरकुटे यांनी पाथर्डी पोलिसांत खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार- मयत शिवहरी व त्याचे वडील एकनाथ सुरकुटे आजारी असल्याने मढी येथे देवाजवळ वास्तव्यासाठी आले होते.
गावातील एका व्यक्तीकडे आई-वडील आणि तिघेजण राहत होते. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता कानिफनाथ गडावर झोपण्यासाठी जागा आहे का, असे आईला सांगून मयत शिवहरी गडावर गेला,
दहा मिनिटांनी मंदिर परिसरात गोंधळ सुरू झाल्याचे लक्षात येताच मंदिराच्या पूर्व बाजूच्या भिंतीजवळ जुन्या भोजनगृहाच्या समोरील भिंतीवरून शिवहरीने उडी मारून आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास करीत आहेत. तरुणाने कानिफनाथ गडावरून उडी मारल्यानंतर सुमारे वीस मिनिटे अत्यावस्थे अवस्थेत तो पडून होता.
मढी देवस्थानची रुग्णवाहिका असतानादेखील तातडीने रुग्णवाहिकेतून त्याला रुणालयात नेण्यात आले नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित ग्रामस्थ व भाविकांनी सांगितले.