अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात रविवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुणालयात पाठविला आहे.
निंबळक बायपास परिसरात रस्त्याच्याकडेला एक महिला मृतावस्थेत पडल्याचे काही ग्रामस्थांना दिसले याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले.
त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक पवन सुपनर पथकासह घटनास्थळी जाऊन हा मृतदेह ताब्यात घेतला.
सदर महिलेची ओळख पटली नसून कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला हे देखील शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे
या महिलेचा खून करून मृतदेह बायपास परिसरात टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews