अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला वीस हजाराचा आकडा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११८ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७३, संगमनेर ४९, पाथर्डी १०, नगर ग्रामीण २१, श्रीगोंदा ०१, पारनेर ११, राहुरी ०७, शेवगाव २७, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण ३११८ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, मनपा ११३७, संगमनेर २११, राहाता १९४, पाथर्डी १०६, नगर ग्रा. १७५, श्रीरामपूर १४२, कॅन्टोन्मेंट ५७, नेवासा ९४, श्रीगोंदा १४७, पारनेर ८७, अकोले १५०, राहुरी ९७, शेवगाव ८४, कोपरगाव २०९, जामखेड १२९,  कर्जत ७५, मिलिटरी हॉस्पीटल २१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५४६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २१९, संगमनेर ०९, राहाता ३०, पाथर्डी २५, नगर ग्रा. ४४, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट १२, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर २५, अकोले ०८, राहुरी ४०, शेवगाव १३, कोपरगाव ३०, जामखेड २१,  कर्जत ०८, मिलिटरी हॉस्पीटल ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत, एकूण १६७५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये, मनपा ६९५६, संगमनेर १३५६, राहाता ७७३, पाथर्डी ८३२, नगर ग्रा. १०५६, श्रीरामपूर ६७१, कॅन्टोन्मेंट ४६७, नेवासा ५९८, श्रीगोंदा ६३२, पारनेर ६७३, अकोले ३४५, राहुरी ३३१, शेवगाव ४८०, कोपरगाव ६२७, जामखेड ३९३,  कर्जत ४७३, मिलिटरी हॉस्पीटल ७३, इतर जिल्हा २० आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
  • बरे झालेली रुग्ण संख्या: १६७५७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३११८
  • मृत्यू: २७८
  • एकूण रूग्ण संख्या:२०१५३
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment