अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील युवक डॉ. प्रशांत (बबलू) प्रमोद जगताप यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ते काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
त्यांच्यावर नगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाने कुळधरण पंचक्रोशीसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा करीत होते.
कोव्हिड सेंटरमधील कोरोना रुग्णांवर त्यांच्याकडून उपचार केले जात होते. मात्र तेथेच ते कोरोना बाधित झाले. सुरुवातीला त्यांच्यावर मॅक्स केअरमध्येच उपचार करण्यात आले.
नंतर त्यांना साईदीपमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved