अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : शहरात आज दिवसभरात १८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे तोफखाना, सिद्धार्थनगर आणि दिल्ली दरवाजा परिसरात आहेत.
तोफखाना परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.परिसर सील करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके जिल्हाधिकारी दिवेदी यांनी पाहणी करत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सूचना दिल्या.
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी मनपा आणि पोलीस यंत्रणेला दिल्या.
तसेच नागरिकांनीही सार्वजनिक संपर्क टाळावा, आजाराची लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले.
दरम्यान नगर शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने अफवांना पेव फुटले आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तपासली जात आहे.
यातून अफवा पसरल्या जात आहे. कोरोना संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका. काही माहिती असल्यास थेट प्रशासनाची संपर्क साधा, असे अहवान जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews