अहमदनगर ब्रेकिंग : ‘ही’ व्यक्ती होणार अहमदनगर जिल्हा बँकेची अध्यक्ष !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (आज) निवडी होणार आहेत. या पदासाठी अ‍ॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते.

लालटाकी येथील जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या बंगल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे उपस्थितीत बँकेच्या संचालकांची बैठक सुरू झाली आहे. 

या बैठकीला संचालक शिवाजीराव कर्डिले, विवेक कोल्हे हे देखील उपस्थित आहेत. बँकेच्या नूतन चेअरमन यांची निवड करण्यात येणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe