अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- थंड हवेच्या ठिकाणी पाहावे तिकडे धुक्याची चादर पसरलेली आणि हवेत कमालीचा गारवा, असे दृश्य सर्रास दिसते. अगदी असाच कडक थंडीचा अनुभव आज सकाळपासून नगरकर घेत आहेत.
हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द
पहाटे दूरवर धुके दिसत होते. हळुहळू धुक्याची लाट नगर शहर व परिसरात पसरत गेली आणि सर्वत्र धुकेच धुके दिसू लागले. सकाळी उशिरापर्यंत धुक्याची ही चादर ओसरली नाही.
हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !
शनिवारी बहुतांश शाळा सकाळी भरत असल्याने स्कूल बस, रिक्षा यांसह स्वतः मुलांना शाळेत सोडवणारे पालक यांची धांदल उडाली.
हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?
रस्ता दिसत नाही, रहदारीचा अंदाज येईना, अशा स्थितीत वाहनांचे दिवे चालू ठेवून, प्रसंगी अधून-मधून हॉर्न वाजवत अनेकांनी मार्ग काढला.चारचाकी वाहन चालकांनी गाडीची साईट लाईट्स चालू ठेवून सावध पवित्रा घेतला.
हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !
अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अधिक काळ राहिलेली अशी ‘धुके’दायक परिस्थिती नगरमध्ये पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे बोलले जात आहे.