अहमदनगर :- नगर शहर विकासाच्या संकल्पनेतून नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले. माझ्यावर आता शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना बरोबर घेऊन मी शहर विकासाला चालना देणार आहे. उपनगरांच्या विकासाबरोबरच मध्यवर्ती शहराचे प्रश्न सोडवणार आहे.
विकासकामांबरोबर रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुकुंदनगरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लावली. सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना एकत्र करून धार्मिक व आनंदाचे वातावरण निर्माण करून नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

मुकुंदनगर येथे रस्ता व पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत होते. या वेळी नगरसेवक समद खान, नगरसेवक बाबा खान, फारूक शेख, हाजी मुनीर सय्यद, हाजी कादर शेख, हाजी इब्राहिम शेख, हाजी अब्दुल सय्यद, आसिफ सय्यद, फैरोज सय्यद, वाहिद हुंडेकरी, अनिस शेख, मुदस्सर शेख, समीर खान, वसीम पठाण, अक्रम शेख, इम्रान खान, अझहर शेख, इम्रान शेख, आयाज सय्यद आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, शहर विकासाचे नियोजन व विकास आराखडा तयार करून प्रत्येक भागात विकासाचे काम करणार आहे. विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण आणले जाणार नाही. सर्व पक्षांना बरोबर घेतले जाईल. विकासकामांमध्ये कोणीही राजकारण करू नये. नगर शहर आपले आहे.
प्रत्येकाने शहराच्या विकासात भाग घेतला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाकडे शहराच्या विकासाच्या निधीसाठी पाठपुरावा करणार आहे. शासनाचा निधी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
- Ahilyanagar Politics : सुप्यातील उद्योजकांना पालकमंत्र्यांचा जाच ! खा. नीलेश लंके यांची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे Railway संदर्भात खा. लंकेंची बैठक ! निंबळक, विळद येथील…
- CNG vs Electric Car : कोणती कार खरेदी करावी ? – कोणत्या कारचा खर्च कमी आणि मायलेज जास्त
- Volkswagen कार्स स्वस्तात ! मार्च महिन्यात Virtus, Taigun आणि Tiguan चार लाखांनी स्वस्त
- Maruti Suzuki Celerio वर 80 हजारांची ऑफर ! 6 एअरबॅग्स आणि 35Km+ मायलेजसह बेस्ट डील