अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७६.२४ टक्के इतकी आहे.
दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९८४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १११, अँटीजेन चाचणीत १४२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८५, पाथर्डी ०३, नगर ग्रा. १०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०४ आणि कोपरगाव ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १४२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २४, राहाता ०३, पाथर्डी ०७, श्रीरामपुर १०, श्रीगोंदा १५, पारनेर २१, अकोले १५, राहुरी ०२, शेवगाव ०९, कोपरगाव १६, जामखेड १६ आणि कर्जत ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६० संगमनेर ०५, राहाता ०५, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर ०१, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले ०४, राहुरी ०३, जामखेड ०१ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २५३ संगमनेर ३८, राहाता २७, पाथर्डी ४८,, नगर ग्रा. ३४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट २७, नेवासा २२, श्रीगोंदा २१, पारनेर २७, अकोले ०५, राहुरी ११, शेवगाव ११, कोपरगाव ०५, जामखेड १२, कर्जत २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या: १००८१
- उपचार सुरू असलेले रूग्ण:२९८४
- मृत्यू :१५८
- एकूण रूग्ण संख्या:१३२२३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved