अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- अहमदनगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने रुद्रावतार धारण केला असून आज दिवसभरात हाती आलेल्या अहवालानुसार तब्बल 643 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या 24 तासमध्ये पुन्हा एकदा सहाशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात आज 449 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 152, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 403 आणि अँटीजेन चाचणीत 88 रुग्ण बाधीत आढळले असून अवघ्या चोवीस तासात जिल्ह्यात 643 रुग्ण वाढले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 53, अकोले 03, जामखेड 09,कोपरगाव 31, नगर ग्रामीण 6, नेवासा 1, पारनेर 2, पाथर्डी 2, राहाता 2, राहुरी 14, संगमनेर 4, शेवगाव 21, श्रीगोंदा -3 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 123, अकोले 8, जामखेड 3, कर्जत 3, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 25, नेवासा 13, पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 60, राहुरी 20, संगमनेर37, शेवगाव 10, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 44, कॅन्टोन्मेंट 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी चार ठिकानी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. त्यामुळे शहरातील मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 19 झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|