अहमदनगर क्राईम न्यूज : अपहरण आणि खंडणी मागतिल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :-  हॉटेल चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात गावठी पिस्तूलचा धाक दाखवत अपहरण करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून दोन लाखांची खंडणी वसूल करणे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यास ठार मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली आपटीच्या सरपंचासह एकुण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ शिवदास जगताप ( वय 24, रा. पिंपळगाव उंडा ,ता. जामखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपटीचे सरपंच नंदकुमार प्रकाश गोरे, सचिन बबन मिसाळ व वाल्मीक किसन काळे (सर्व रा. आपटी, ता. जामखेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी 25 मार्चला त्याच्या पिंपळगाव उंडा येथील घरी आसताना आरोपी हे त्या ठिकाणी आले आणि फिर्यादीस हॉटेल चालवण्याच्या कारणावरून सरपंच नंदकुमार गोरे व सचिन मिसाळ या दोघांनी गावठी कट्याचा व पिस्तूल चा धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यांनी आणलेल्या विनानंबरच्या चारचाकी वाहनातून फिर्यादीला सरपंच गोरे यांच्या आपटी येथील शेडवर घेऊन गेले. या ठिकाणी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर फिर्यादीच्या वडील व त्याच्या चुलत्यांकडे दोन लाख रुपयांची मागणी करुन दोन लाखांची खंडणी वसुल केली. त्यानंतर फिर्यादीला सोडून देण्यात आले. तसेच पोलीसात तक्रार केली तर ठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना 25 ते 26 मार्चदरम्यान घडली आहे. मात्र, फिर्यादी जखमी असल्याने फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला. सोमनाथ जगताप यांनी रविवारी रात्री जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment