जिल्हा बँक निवडणूक Live Updates : कर्डीले, शेळके, पिसाळ,गायकवाड झाले विजयी !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक उदय गुलाबराब शेळके यांनी १०५ पैकी मते ९९ घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला. नगरमध्ये शिवाजी कर्डीले यांनी ९४ मते घेऊन तर, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी झाले आहेत.व पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी पानसरे यांचा पराभव केला आहे.  

शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा विजयी :- जिल्हा बँकेच्या संचालकांच्या मंडळाच्या निवडणुकीसाठी नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातूनविद्यमान संचालक शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी उमेदवार सत्यभामा बेरड यांचा ९४ मतांनी पराभव केला. या विजयाने कर्डिले आपल्या सर्व विरोधकांना गुलाल आमचाच असल्याचे दाखवून दिले आहे.

सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी  :- जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी झालेले आहेत. जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदार संघात उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत झाली. या लढतीत भोसले यांना सहा मते तर शेळके यांना 99 मते पडली. शेळके विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी करताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

अंबादास पिसाळ एक मताने विजयी :- कर्जत सोसायटी मतदार संघाची लढत मीनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ यांच्यात झाली. कर्जत सोसायटी मतदार संघाच्या 74 मतदारांपैकी 73 जणांनी मतदान केले होते. मतमोजणी मध्ये अंबादास पिसाळ यांना अवघी एक मताने विजयी झालेले आहे. यामध्ये साळुंके यांना 36 तर पिसाळ यांना 37 मते मिळाली. पिसाळ विजयी झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली.

सभापती प्रशांत गायकवाड विजयी :-  जिल्हा बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून गायकवाड यांना 763 तर विरोधी पानसरे यांना 574 मते मिळाली यात जिल्हा बँकेचे संचालक व श्रीगोंद्यातील दत्तात्रय पानसरे यांचा दारुण पराभव झाला आहे, पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी तब्बल 189 मतांनी  पानसरे यांचा पराभव केला आहे. सुरुवातीला सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचा मार्ग अवघड झाल्यावर पानसरे यांनी दुसऱ्या मतदारसंघात अर्ज दाखल करून कुठल्याही प्रकारे जिल्हा बँकेत जाण्याचा चंग बांधला होता परंतु यामध्येही त्यांना अपयश आले आहे .पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी आपल्या संपर्काचा फायदा घेत सर्व नेत्यांची व गटाची सांगड घालत निवडणूक एकहाती जिंकल्याचे दिसून आले आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळेत अपडेट होईल) 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe