अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील नगर – मनमाड रस्त्यावर देवकर फाटा येथे रामेश्वर दत्तात्रय शेंडगे , रा . सुभाषवाडी , ऐनतपूर , ता श्रीरामपूर याच्या दुचाकीवर बसून मामा अण्णासाहेब मार्तड बडितके , वय ५१ रा . कडीत बु , ता . श्रीरामपूर हे कामानिमित्त भाच्यासोबत जात असताना भाचा रामेश्वर याची दुचाकी नगर – मनमाड रस्त्याच्या कडेने जात असताना खड्ड्यात घसरली.
हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

त्यात मामा अण्णासाहेब हे उडून खाली खड्ड्यात पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. भाच्याने अपघात झाल्याचा फोन मामीला केला. तेव्हा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना अण्णासाहेब वडितके हे मयत झाले.
याप्रकरणी मयताच्या पत्नी अलका अण्णासाहेब वड़ितके, रा. कडीत बु. यांनी काल लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी रामेश्वर दत्तात्रय शेंडगे याच्याविरुद्ध भादवि कलम ३०४ अ , २७९ , ४२७ , मोटर वाहन कायदा कलम १८४ , १८७ प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून २ जानेवारीला हा प्रकार घडला.
हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !