अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यांचा निषेध भारतीय जनता पार्टीने केला आहे. खा.राऊत हे नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत.
शिवसेनेने त्यांचेवर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. खा.राऊत यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटवून उठेल.

असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिला.खा.राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध गुरूवारी सायंकाळी चौपाटी कारंजा येथे करण्यात आला.
खा.राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, नगरसेवक मनोज कोतकर, सतीश शिंदे, अजय चितळे, अनिल गट्टाणी, विनोद भिंगारे, मयुर बोचुघोळ, विलास नंदी, महावीर कांकरिया, गणेश औसरकर, मनिष लोढा, शाकिर सय्यद, सचिन चोरडिया, शरद मुर्तडक, बंट्टी ढापसे, गोकूळ काळे, अवचट आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.