अहमदनगर :- अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत झेडपीत विखेंची दहशत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
‘अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणा या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि ”ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणी दिशाभूल करणारी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.
शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही या प्रकरणाची माहिती मिळाली नाही. उलट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम होत आहे.
नगर जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा नवा इतिहास रचला गेला आहे. या जिल्हा परिषदेत अध्यक्षा बोलतील तेच ऐकायचं, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत.
अकोलेतील ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणी संबंधीत बीडीओस सक्तीच्या रजेवर पाठवावे तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी दराडे यांनी केली.
यासाठी येत्या सोमवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन देणार आहे. चार दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्हा परिषदेत उपोषण करणार असल्याचे दराडे यांनी या वेळी सांगितले.
दराडे म्हणाल्या, ‘अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीत झालेल्या अपहाराबाबत याआधी माहिती मागितली होती. परंतु, प्रशासनाकडून माहिती मिळत नव्हती.
त्यामुळेच शुक्रवारी सर्वसाधारण सभेत हा प्रश्न विचारला होता. या सभेतही आम्हास अपेक्षित माहिती मिळाली नाही. या प्रश्नाचे निरसन व्हावे असे वाटते.
परंतु, येथे अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे. जे आवाज दाबतात त्यांच्याकडूनच या अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे.