मुंबई :- ‘भाजपने अजित पवारांना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद व 20 मंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती मिळते.
शिवसेनेसला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले नाही आणि आता अजित पवारांना ही ऑफर देणं भाजपला शोभतं का? भाजपने दिलेलं वाचन पाळलं नाही,’ असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर प्रचंड दबाव आहे. त्यांची फसवणूक करून त्यांना आपल्याकडे ओढले आहे.
ते खूप हळवे असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. त्यांचे अश्रूही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत, भविष्यात अजितदादांचे अश्रू दिसतील अशी आशा असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्वच आमदार परतले आहेत. काही आमदारांना गुरूग्रामच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवर केला
राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. सत्तेचा कितीही गैरवापर करा. आम्ही पुरून उरू. कितीही गडबड, घोटाळे करा,
पण विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी तुमच्यापेक्षा आमच्याकडे दहाने आकडा अधिक असेल, असा दावा त्यांनी केला.