अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार बारामतीमधून सात वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री आज शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोणते खाते मिळणार आणि ते उपमुख्यमंत्री होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर नावे निश्चित करण्यात आली आहेत
उपमुख्यमंत्री :- अजित पवार
कॅबिनेट मंत्री ;- अशोक चव्हाण दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार अनिल देशमुख हसन मुश्रीफ वर्षा गायकवाड डॉ. राजेंद्र शिंगाणे नवाब मलिक राजेश टोपे सुनिल केदार संजय राठोड गुलाबराव पाटील अमित देशमुख दादा भुसे जितेंद्र आव्हाड संदिपान भुमरे बाळासाहेब पाटील यशोमती ठाकूर अनिल परब उदय सामंत के.सी. पाडवी शंकरराव गडाख असलम शेख आदित्य ठाकरे
राज्यमंत्री :-अब्दुल सत्तार सतेज उर्फ बंटी पाटील शंभुराजे देसाई बच्चू कडू विश्वजीत कदम दत्तात्रय भारणे आदिती तटकरे संजय बनसोडे प्राजक्त तनपुरे राजेंद्र पाटील येड्रावकर