मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर आपण भाजपला का पाठिंबा दिला याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी ही माहिती एका मराठी वृतावाहीनीला दिली आहे.
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका होऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता.
मला आता शब्द फिरवायला सांगितला जात आहे, असं अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना सांगितलं.
मला आमच्या नेत्यांकडून गप्प बसायला सांगितले जात आहे, पण या वेळी मी गप्प बसणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
पण वेळ आल्यावर आपण सर्व काही बोलणार आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ठ केले