अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड (वय 70) यांचे आज (बुधवारी) पहाटे ह्यदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली असा परिवार आहे
माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तर, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
माजी राज्यमंत्री,शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचं निधन झाल्याचं समजून धक्का बसला.त्यांच्या निधनानं सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. pic.twitter.com/UA450x59kQ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 5, 2020
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved