अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.
गर्दी टाळावी, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करावे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी, , अशा सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत करोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली.
यावेळी . डॉ. डी. बी.कदम यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गृह विलगिकरण, ऑक्सिजन युक्त बेडवरील रुग्ण,
उपलब्ध बेड यांसह ग्रामीण भागातील कोविड-19 सद्यस्थितीची माहिती देऊन उपाययोजनांची माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटर येथील बेडची संख्या आवश्यकतेनुसार 800 पर्यंत वाढवून हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करा,
पिंपरी-चिंचवड येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करा,
खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याची कार्यवाही करा, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका,
ऑक्सिजन युक्त बेड आदी आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा, अशा सूचना पालकमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|