अकोले :- पराभवाची भीती आणि राजकीय लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेही पिचडांसोबत भाजपत गेले. अशा परिस्थितीत विरोधक म्हणून आता गावोगावी संघटन असलेला माकप हा एकमेव राजकीय पक्ष शिल्लक आहे.
माकप संपूर्ण ताकदीने या विधानसभा निवडणुकीत हस्तक्षेप करून राजकीय तत्त्वनिष्ठता आणि पावित्र्याची जपवणूक करण्यात आघाडीवर राहील, असे माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. शहरातील माकप पक्ष कार्यालयात तालुका व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यासाठी आयोजित माकपच्या जिल्हा मेळाव्यात डॉ. नवले बोलत होते.

यादवराव नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, साहेबराव घोडे, सुरेश भोर, बाळासाहेब वाळुंज, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. नवले म्हणाले, क्षणार्धात तत्वांना व स्वपक्षाला तिलांजली देणाऱ्या प्रवृत्ती समाजाच्या शाश्वत व दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत मारक असतात.माकपतर्फे एकनाथ मेंगळ, नामदेव भांगरे व तुळशीराम कातोरे यांची नावे विधानसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेला आली.
विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या जागावाटपासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर माकपची राज्यस्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीमधून झालेले पक्षांतर पाहता या वाटाघाटीत माकप या जागेसाठी स्वाभाविक दावेदार म्हणून मागणी करत आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले.
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख
- iQOO Neo 10R लाँच होतोय ! 6400mAh बॅटरी + 80W फास्ट चार्जिंग ,बाजारात धुमाकूळ घालणार
- Shaktipeeth Highway : कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध ! नागपूर-गोवा महामार्गावर मोठा निर्णय
- शेअर बाजारातील घसरण कधी थांबणार? घसरणीच्या काळात ‘या’ स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला