अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप उमेदवाराला लाभदायी ठरणार आहे.
दरम्यान भाजप पुन्हा आरती बुगे यांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते.
महापालिकेच्या सहा नंबर वार्डातील नगरसेविका सारिका भूतकर यांचे पद रद्द झाल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. 6 फेब्रुवारीला मतदान असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या वार्डातील तिनही नगरसेवक भाजपचे असून महापौर बाबासाहेब वाकळे याचा वार्डातून निवडून आले आहेत. त्यामुळे चौथा नगरसेवकही भाजपचा असावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटाला सोबत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा बंडखोर गट शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराचे काम न करता अलिप्त राहण्याच्या वाटेवर असल्याचे समजते.
तसे झाले तर त्याचा लाभ भाजप उमेदवाराला होणार आहे. शिवसेनेचा उमेदवार कोण? याचा सर्वस्वी निर्णय उपनेते अनिल राठोड हेच घेणार आहेत.
मात्र त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे काम न करण्याच्या हालचाली बंडखोर गटात सुरू आहे. पर्यायाने राठोड विरोधात सगळे असे राजकीय वातावरण नगरकरांना पहावयास मिळणार आहे.राष्ट्रवादीने उमेदवार द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय अद्यापतरी घेतला नसल्याचे समजते.
राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला तर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिलेल्या उमेदवारांविरोधात सगळे असे नवे राजकीय चित्र नगरमध्ये पहावयास मिळणार आहे.