अहमदनगर :- राज्याचे जलसंधारणमंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड मध्ये अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचे समोर आले आहे.
मंत्री राम शिंदे यांचे वडिल शंकर बापू शिंदे यांनी मौजे चौंडी, रा. जामखेड, जि. अहमदनगर येथील सर्वे नं. 2/3 या जागेवर चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर शासकीय जमीनीत अतिक्रमण करुन बंगला बांधला आहे.

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी त्यांचे वडील शंकर बापू शिंदे यांच्या नावावर चौंडी येथे चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर
अनुक्रमे 15 मिटर ते 12 मिटर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचा आरोप कर्जत येथील अॅड. कैलास शंकरराव शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शेवाळे यांनी दिला आहे.
पालकमंत्री राम शिंदे यांनी अधिकार्यांवर दबाव आणून व सत्तेचा दुरुपयोग करुन सदरचे अतिक्रमण केलेले आहे. सदरच्या अतिक्रमणामुळे गावातील व इतर लोकांना सदर रस्त्याचा वापर करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पालकमंत्री राम शिंदे हे त्या इमारतीमध्ये स्वतः राहात आहेत. दोन्ही सरकारी रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरीत काढून टाकण्याबाबत तात्काळ चौकशी होऊन आदेश देण्यात यावेत.
अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात येईल, असा इशारा शेवाळे यांनी निवेदनात दिला आहे.
- Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 248 किमीच्या जबरदस्त रेंजसह लाँच – किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
- 2025 Kia Seltos आता आणखी स्वस्त ! दमदार इंजिन, जबरदस्त मायलेज आणि अधिक फीचर्स
- 34km मायलेज देणारी मारुती कार फक्त दोन लाखांत मिळणार जाणून घ्या ऑफर
- ब्लॅक लुकमध्ये आली नवी स्कॉर्पिओ एन कार्बन एडिशन – किंमत, फीचर्स आणि इंजिनबाबत संपूर्ण माहिती
- Tata Punch EMI Plan : फक्त 1 लाख रुपयांत घरी आणा टाटा पंच ! पहा पूर्ण फायनान्स प्लॅन