Mumbai News : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबईला २०२५ च्या जगातील सर्वोत्तम रुग्णालयांच्या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळाले आहे. ही यादी न्यूजवीकने स्टेटिस्टाच्या सहकार्याने तयार केली आहे. रुग्णालयाची क्लिनिकल उत्कृष्टता, तांत्रिक नावीन्य घडवून आणण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या बळावर हे यश मिळाले आहे.
न्यूजवीक आणि स्टॅटिस्टा यांनी ३० देशांमधील २,४४५ रुग्णालयांचे मूल्यांकन केले. हे रँकिंग रुग्णालयाचे जागतिक स्तरावरील स्थान दर्शवते. नावीन्य, पर्सनलायजेशन आणि रुग्णकेंद्रित देखभालीच्या माध्यमातून जगातील सर्वश्रेष्ठ मापदंडांना अनुरूप आरोग्य सेवा मापदंडांची नवी व्याख्या करणे या रुग्णालयाने कायम राखले आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट भारतामध्ये सर्वश्रेष्ठ रँकिंग असलेल्या रुग्णालयांपैकी एक आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले की,
भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक म्हणून ओळखले जाणे, ही बाब आमची संस्कृती दर्शवते, ज्यामध्ये आम्ही करुणा आणि रुग्णांना प्राधान्य देतो. आमचे रुग्णालय जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, एक अद्वितीय पूर्णवेळ विशेषज्ञ प्रणाली आणि समग्र मल्टी-डिसिप्लिनरी देखभालीसह बेंचमार्क स्थापित करत आहे.