अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेमध्ये सभापती मुदस्सर शेख यांनी कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगा विषयावरील ठराव वाचून दाखवला; त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने तो मंजूर करण्यात आला.
सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचार्यांमध्ये मोठे आनंदाचा वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे यामध्ये जे कर्मचारी महानगरपालिकेमधून सेवानिवृत्त झाले आहे त्या कर्मचार्यांना पण सातव्या आयोगाचा लाभ मिळणार आहे.
कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याबद्दल युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, कार्याध्यक्ष गुलाब गाडे, शेख पाशा इमाम, बाबासाहेब मुदगल, आयुब शेख आदिंसह कर्मचार्यांनी महापौर व सर्व नगरसेवक तसेच मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचे विशेष आभार मानले.
महानगरपालिकेत सुमारे 2 हजार 200 कर्मचारी असून, त्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचार्यांनी जल्लोष करुन आनंद व्यक्त केला.
- आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
- तब्बल 10 वर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना दिलासा! कांदा साठवणुकीच्या शीतगृहांना मिळणार अनुदान
- विकासात संगमनेर तालुका राज्यात पहिल्या तीन मध्ये ! राजेश टोपे, डॉ रावसाहेब कसबे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव
- टाटाच्या ‘या’ दोन्ही इलेक्ट्रिक कारवर मिळत आहे 85 हजारापर्यंत सवलत !
- Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील महापुरुष, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी