अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले ‘हे’ आश्वासन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असतानाच आता नैसर्गिक संकट घोंगावत आहे. ‘ निसर्ग ‘ चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसेल अशी शक्यता असल्याने सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली.

या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज्याने संभाव्य काय खबरदारी घेतलेली आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिली.

राज्य सरकारने मुंबई, ठाणे, कोकण, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या भागात अलर्ट घोषीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. NDRFची पथकं किनारपट्टीच्या भागात तैनात करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.

तर आणखी काही मदत लागल्यास ती देण्याची तयारी अमित शहा यांनी दाखवली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत सरकारच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. ते म्हणाले,

अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे. कोकण किनारपट्टीवर NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment