अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला आहे.(Minister Amit Shah)

पुण्यातील महत्वाच्या कार्यक्रमानंतर शाह यांनी भाजप कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिकेवर भाजपला झेंडा कायम राहणार असल्याचा दावाही केलाय.
अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी.
महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत, असा घणाघात शाह यांनी केला. तसंच सत्तास्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप शाह यांनी यावेळी केलाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम