सांगली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात न उतरण्याचा सल्ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. राज्यभरात पडद्याआडच्या भूमिका प्रभावीपणे निभावण्याच्या शैलीमुळे चंद्रकांत पाटील यांची रणनीती विधानसभा निवडणुकीत उपयोगी येणार आहे.
त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढवू नये, अशी सूचना त्यांना शहा यांनी केल्याचे मानले जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाजपसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, राजू शेट्टी अशा अनेक बड्या विरोधकांना अंगावर घेतले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झंझावात उभा केला, तो पाहूनच त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, शरद पवार यांनी ‘पाटील यांनी जनतेतून निवडून यावे’, असे आव्हान दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवा, असा आग्रह मंत्री पाटील यांना होऊ लागला.
खुद्द चंद्रकांत पाटीलही याबाबत गांभीर्याने विचार करीत होते, अशी चर्चा त्यांच्या खास कार्यकर्त्यांतून होत होती. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘तुम्ही स्वतः उमेदवार झालात, तर नाही म्हटले तरी ती निवडणूक प्रतिष्ठेची होईल.
तुम्हाला मतदारसंघात वेळ द्यावाच लागेल. त्यापेक्षा राज्यातील महत्त्वाच्या सभा, बैठकांसाठी वेळ देऊन पक्ष जास्तीत जास्त जागा कशा जिंकेल, यासाठी प्रयत्न करा,’ असा सल्ला दिला आहे.
- महाराष्ट्रातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हा’ छोटासा नियम पाळला नाही तर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार
- EMI वर मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी आरबीआय नवा नियम आणणार ! आता हफ्ता भरला नाही तर…
- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 16 कोचवाली वंदे भारत एक्सप्रेस
- नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींसाठी Good News ! मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
- पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास किमती किती रुपयांनी कमी होणार ? एक लिटर पेट्रोलसाठी फक्त ‘इतके’ पैसे मोजावे लागणार