अमृता फडणवीस म्हणाल्या पलट के आऊंगी,मौसम ज़रा बदलने दे!

Ahmednagarlive24
Published:

मुंबई :- अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला. सरकार अल्पमतात आल्यामुळे त्यांनी बहुमत चाचणी होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारं संख्याबळ नसल्यामुळे काही दिवसांमघध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सरकार अल्पमतात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानिमित्ताने फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक शेरो-शायरी केली आहे.

अमृता फडणवीस यांनी हिंदीतून ट्वीट केलं आहे. यामध्ये त्या म्हणतात, ‘पलट के आऊंगी शाखों में खुशबुएं लेकर, ख़िजां की ज़द में हूं मौसम ज़रा बदलने दे!’

यासोबतच पाच वर्ष वहिनी म्हणून जे प्रेम दिलं त्याबद्दलही त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले.

‘तुम्ही जे प्रेम दिलं, त्याने आठवणी कायम राहतील. मी माझ्या क्षमतेनुसार नेहमीच जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न केला. तुमची सेवा करुन सकारात्मक बदल आणावा एवढीच इच्छा होती’, असंही त्या म्हणाल्या.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment