अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-आज अमृता फडणवीस यांनी बालिका दिनानिमित्ताने ट्विट करून मुलींना शिकवा असं आवाहन केलं आहे. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे.
अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.
या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. मात्र, बऱ्याचवेळा अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना ट्रोल केले जाते पण याकडे अमृता फडणवीस या दुर्लक्ष करतात.
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकताच प्रदर्शित झाले होते. ‘अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी गाणं गायलं आहे. या गाण्याच्या संगीतातून सिनेमात गूढ विषय हाताळल्याचं दिसतं.
जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी,
दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved