शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविणारे अमृतराव गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Published on -

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.

शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतात जनता पार्टीचा झेंडा रोवला गेला त्यात नानांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता स्थापन केली होती.

नानांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष, शिर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम केले होते. उद्योजक दिलीपराव व शिवाजीराजे गोंदकर यांचें वडील होत

दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे अमृतराव गोंदकरयांच्या निधनाने शिर्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe