अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये बैठका घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना-भाजप कामाला लागली आहे.
राष्ट्रवादीने नगरमध्ये केलेली फोडाफोडी आणि जिल्ह्यातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी अनिल राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाले.
भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये जाऊन बैठका घेतल्या.
शिवाय भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दोन पुतण्यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रचार केला.
संपूर्ण नगर शहराची जबाबदारी अनिल राठोड यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारासाठी दोन्हीही पक्ष कामाला लागले आहेत.