अनिल राठोड यांची ‘ती’ शेवटची इच्छा अधुरीच राहिली…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे अहमदनगरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी,  एक मुलगा व मुली असा परिवार आहे. 

राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर शोककळा पसरली आहे. परंतु त्याची एक शेवटची इच्छा अपुरीच राहिल्याची खंत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली.

कळमकर म्हणाले, ‘राम मंदिर आंदोलनाशी ते सुरुवातीपासून जोडले गेलेले होते. सुप्रिम कोर्टाने जेव्हा राम मंदिर प्रकरणाचा निकाल दिला तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. आपल्या डोळ्यादेखत अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण सुरु होईल, याचा त्यांना खूप आनंद होता. आताही राम मंदिर निर्माण भूमीपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून तो सोहळा दूरचित्रवाणीवर पाहण्याचे त्यांनी ठरवले होते.

यादिवसासाठी ते खूपच उत्साही व उत्सुक होते. दुर्देवाने हा सोहळा सुरु होण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘ त्यांची हि इच्छा अपुरीच राहिली असेही कळमकर म्हणाले. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेचा चेहरा असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन सर्वांसाठीच खूप धक्कादायक आहे.

रोज त्यांच्या संपर्कात असल्याने ते असे सर्वांना सोडून जातील असे कधीच वाटले नाही. गोरगरीबांसाठी, सर्वसामान्यांसाठी लढणारे ते एक योध्दा होते. आताच्या करोनाकाळात लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गरजूंना प्रचंड अशी मदत केली असल्याचे कळमकर म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment