अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-स्वामीनाथन आयोगासह शेतकर्यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले असून शेतकर्यांच्या हक्कासाठी 30 जानेवारीपासून हजारे यांनी राळेगणसिध्दीत उपोषण करण्याचा संकल्प केला आहे.
राळेगणसिद्धीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय किसान परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. दरम्यान यावेळी राज्यातील 26 कृषी संघटना 100 ठिकाणी अण्णांच्या या शेतकरी आंदोलनाचा पाठींबा देणार असून ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांनी दिली.
पंतप्रधान कार्यालयाकडून 29 मार्च 2018 रोजी रामलिला मैदान येथे सात दिवस उपोषण करून केंद्र सरकारने सातव्या दिवशी लेखी आश्वासन दिले होते. त्याचे अद्याप पालन झाले नाही.
आश्वासनाचे पालन होत नसल्यामुळे दुर्दैवाने मला माझ्या शेतकरी राजासाठी परत 30 जानेवारीला उपोषणाला बसावे लागणार आहे. यात बळीराजासाठी मरेपर्यंत लढणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
देशभर सुरु असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनावर केंद्र सरकारचे लक्ष नाही. आंदोलनात 50 हुन अधिक शेतकरी कष्टकरी शहीद झाले तरीही केंद्र सरकार शेतकर्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही.
त्यामुळे शेतकर्यांच्या विविध मागण्यांवर हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘करेंगे या मरेंगे’ हे आंदोलन देशभरात छेडणार असे प्रदेशाध्यक्ष पवार यांनी यावेळी जाहीर केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved