शेतकऱ्यांसाठी अण्णाही करणार एक दिवसाचे आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-  केन्द्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीसह देशभरात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असुन उद्या 8 डिसेबंर रोजी भारतबंदचे आवाहन केले आहे याबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या 8 डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे .

शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठींबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उद्या ( मंगळवारी ) येथील पद्मावती मंदिरात एकदिवसीय मौन आंदोलन करणार आहेत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समर्थन केले आहे. अण्णा हजारे यांनी विविध मुद्दे मांडले..

कृषीमूल्य आयोगाला सरकारनं स्वायत्तता द्यायला हवी, अशी आमची मागणी आहे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारनं गेल्या वेळेस मान्य केली. 23 मार्च 2018ला लिखित आश्वासन दिलं पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो, पण आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी 7 दिवस उपोषण केले. कृषीमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्वासन दिले की ,कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनवण्यात येईल. 30 ऑक्टोबर 2019ला समितीचा अहवाल येईल. त्यानंतर कार्यवाही करू.

पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतरही स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही. शेतकरी आंदोलनातच हिंसा नाही. अहिंसेच्या मार्गानं आंदोलन सुरू आहे. सरकारने पाच वेळेस बैठका घेऊनही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत.

मला लिखित आश्वासनं देऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. आता कृषीमंत्री आश्वासनं पूर्ण करणार का?, हा प्रश्न आहे. देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे. सरकारचं नाक दाबल्यानंतर तोंड उघडलं पाहिजे,

अशी स्थिती निर्माण केल्यानंतरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे. कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता दिली नाही आणि स्वामीनाथन आयोगानुसार पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा भाव शेतकऱ्यांना न दिल्यास मी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा सरकारला दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment