अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन महिला रुग्णावर एका डॉक्टरने वाहनातच लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना 7 डिसेंबर रोजी एसआरपीएफ क्वॉर्टरसमोरील चांदुररेल्वे रोडवर घडली.
9 डिसेंबर रोजी पिडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी डॉ. लच्छुराम जाधवानी (48 रा. ताजनगर) याचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. २६ वर्षीय महिला नेहमी डॉ. लच्छुराम जाधवानीकडे उपचाराकरिता जात होती.
त्यामुळे डॉक्टरला महिलेच्या परिस्थितीबद्दल माहिती होती. 7 डिसेंबर रोजी महिलेला बरे वाटत नसल्यामुळे ती डॉ. जाधवानी यांच्या दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी तपासणी करून बीपी वाढल्याचे कारण सांगितले.
तुम्हाला कशाचे टेंशन आहे,असे डॉक्टरने विचारल्यानंतर कोरोनाच्या साथीमुळे काम नसल्याचे महिलेने सांगितले. त्यावेळी माझा मित्र व्याजाने पैसे देऊ शकते, परंतू त्यासाठी कॅम्प परिसरात जावे लागले, असे डॉक्टरने महिलेला सांगितले.
त्यानंतर महिला महापालिका शाळा क्रमांक 13 जवळ थांबली असता, डॉ. जाधवानी पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहनाने तेथे पोहोचले. त्यात महिलेला बसवून घेतले. सकाळपासून उपाशी असाल, असे म्हणून महिलेला नास्ता दिला.
एका बॉटलमधील पाणी प्यायला दिले. परंतू पाणी पिल्यानंतर महिलेला गुंगी आली. त्यानंतर डॉ. जाधवानीने कॅम्पकडील मित्राकडे जात असल्याचे सांगून एसआरपीएफ पोलिस क्वॉर्टरसमोरील रोडवर अंधारात गाडी थांबविली. त्यानंतर डॉ. जाधवानीने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडिताने तक्रारीतून केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com